आईला शिवीगाळ का करता अशी विचारणा केल्याने तरुणाला ९ जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी सळईने मारहाण केल्याने त्याची पायाची नडगी फ्रॅक्चर झाली आहे.त्याविरोधात महिलेने तक्रार दिली आहे. सनी सुनिल पवार (वय २०) हा जबर जखमी झाला असून त्याच्यावर भारती हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. सहकारनगर पोलिसांनी संतोष सुरेश पवार (वय २८), अनिल सुरेश पवार (वय ३८), रुपाली सुरेश पवार (वय ४२), ताई सुरेश पवार (वय ७०), सुरेश चॉकलेट पवार (वय ७१), सुरेखा सुरेश पवार (वय ३८), बावड्या सुरेश पवार (वय ३८), दक्षणा संतोष पवार (वय ३०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कांदा बटाटा खरेदीविक्रीचा व्यवसाय आहे़ ३० सप्टेबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता फिर्यादी यांच्या आई भारती हिच्यासोबत कोणीतरी भांडण करीत असल्याचा आवाज आल्याने फिर्यादी यांनी बाहेर जाऊन पाहिले. रुपाली सुरेश पवार ही आईला शिवीगाळ करत होती. त्याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली. तेव्हा पवार कुटुंबियांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. अनिल पवार याने लाकडी बांबुने तर बावड्या पवार याने लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केली. सनी पवार यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्या नडगीवर फ्रॅक्चर झाले आहे.
याविरोधात दक्षणा संतोष पवार (वय २५,) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुनिल सुरेश पवार (वय ४५), भारती सुनिल पवार (वय ३८), सनी सुनिल पवार (वय २०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी काही एक कारण नसताना बांबुने फिर्यादी व त्यांच्या नणंदेला मारहाण केली. तसेच आरोपी यांचा मुलगा सनी याने त्याच्या हातातील कोयत्याने कपाळावर वार करुन जखमी केले आहे. पोलीस हवालदार जाधव तपास करीत आहेत.