ठाकरे गटाकडून लोकसभेच्या तीन उमेदवारांची घोषणा?
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाची आघाडी, शिंदे गटातील या नेत्यांच्या अडचणी वाढणार, या नेत्यांवर मोठी जबाबदारी
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. पण त्याआधीच ठाकरे गटाने लोकसभेच्या तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा इरादा स्पष्ट केल्याचे संकेत दिले आहे.
महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा पाच राज्यांच्या निवडणुक निकालानंतर होणार आहे. पण त्याआधीच ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. ठाकरे गटाने मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासातून संजय दीना पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्याशिवाय रायगड लोकसभेमधून माजी ठाकरे गटाचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या या निर्णयावर महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडून पाठिंबा देण्यात येतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याशिवाय ठाकरे गटाकडून दहा नेत्यांवर महाराष्ट्रातील विविध विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामधून देखील काही उमेदवारीचे संकेत मिळताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीनंतर शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा उत्साह भरण्यासाठी उद्धव ठाकरे हे पूर्णपणे सक्रीय होणार असून, ते राज्यभर दौरा करणार आहेत. यामध्ये गटाकडून राज्यव्यापी शिबिर घेतले जाणार आहेत. तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यांच्या महाराष्ट्र दौरा आणि जाहीर सभांचे नियोजन सुद्धा लवकर जाहीर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अनंत गीते – कोकण
चंद्रकांत खैरे- मराठवाडा
खासदार अरविंद सावंत- पश्चिम विदर्भ
खासदार अनिल देसाई, पश्चिम महाराष्ट्र
आमदार भास्कर जाधव- पूर्व विदर्भ
खासदार विनायक राऊत- दक्षिण कोकण
खासदार राजन विचारे- उत्तर कोकण
आमदार रवींद्र वायकर- दक्षिण मराठवाडा
आमदार सुनील प्रभू – मराठवाडा, सोलापूर
संजय राऊत – उत्तर महाराष्ट्र, पुणे