Latest Marathi News
Ganesh J GIF

भाच्याच्या धमकीच्या त्रासाने वैतागलेल्या मामीने केली आत्महत्या

पत्नीच्या आतदमहत्येनंतर पतीचीही आत्महत्या, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटनेने खळबळ

नालंदा दि ९(प्रतिनिधी)- महिला आत्महत्येचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बिहारमध्ये एका महिलेने आपल्या भाच्याकडून होत असलेल्या धमक्यांना घाबरून आत्महत्या केली आहे. पण त्यानंतर लगेच पतीनेही आत्महत्या केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

बिहार मधील नालंदा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पूजा देवी आणि तिचा पती जितेंद्र साव असे आत्महत्या करणाऱ्या पती पत्नीचे नाव आहे. पोलीसांनी त्यांचा भाचा अमित कुमार याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरियाणात राहणार अमित आपला मामा जितेंद्रकडे नेहमी येत जात असायचा पण एक वर्षापूर्वी त्याने आपली मामी पुजादेवीचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला. त्याद्वारे तो मामीला सतत धमकी देत होता. ही घटना पूजाने आपल्या घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी अमितला तसे न करण्याची ताकीत दिली होती. तसेच तो व्हिडिओ डिलीट करण्याचे बजावले होते. पण तरीही अमित आपल्या मामीला धमकी देत आपण जसे सांगू तसे वाग म्हणून धमकी देत होता. कोणाच्याच सांगण्याचा त्याच्यावर फरक पडत नव्हता. अखेर त्या त्रासाला कंटाळून पूजाने गळफास घेत आत्महत्या केली. पत्नीच्या निधनानंतर जितेंद्र कायम तणावात असायचा. त्याची मानसिक स्थिती ढासळली होती. त्यामुळे त्यानेही पत्नीच्या निधनानंतर आत्महत्या केली पूजा आणि जितेंद्रचा २०१३ मध्ये विवाह झाला होता. दोघांनी आत्महत्या केल्याने त्यांची तीन मुले पोरकी झाली आहेत.

पोलीसांनी आरोपी अमित कुमार याला अटक केली आहे. पण जितेंद्रने आत्महत्या केल्याची माहिती न देता नातेवाईकांनी त्याचे अंतिम संस्कार केल्याने त्याच्या आत्महत्येची माहिती का लपवण्यात आली याचा तपास आता पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!