Latest Marathi News
Ganesh J GIF

तोतया आयएएस तायडेचा आणखी एक गुन्हा उघड

तळेगाव – तोतया आयएएस अधिकारी विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे  याचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. त्याने एका महिलेसोबत मिळून भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तब्बल ४२ लाख रुपये घेऊन फसवणूक केली.

याबाबत बुधवारी (दि. ७) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनीष उर्फ मेघेंद हेमकृष्ण कापगते (वय ४२ , रा. साकोली, जि. भंडारा) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तायडे याने तो पंतप्रधान कार्यालयात सचिव पदावर कार्यरत असल्याची खोटी ओळख दाखवली. त्याची प्रशासनातील उच्च पदावरील व्यक्तींशी ओळख असल्याचे सांगून त्याने नवीन सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करून देतो असे आमिष फिर्यादी यांना दाखवले.

त्यासाठी १ मे २०२२  ते २३ जुलै २०२२या कालावधीत फिर्यादीकडून त्याने ४२  लाख रुपये घेतले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्याने शाळेची मंजुरी न देता तसेच घेतलेले पैसे परत न देता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

सामाजिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून गेला अन बिंग फुटले 

औंध परिसरातील सिंध हाऊसिंग सोसायटी येथे २९ मे रोजी औंध पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मु काश्मीर येथे मदतीसाठी पाठवीण्याकरीता ॲम्बुलन्स लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून डाॅ. विनय देव हा व्यक्ती स्वतः आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरी पदावर गोपनीय काम करत असल्याचे सांगत होता. मात्र त्याने सांगिितलेल्या माहितीबाबत संस्थेच्या पदाधिका-यांनी अधिक विचारणा केली असता प्रमुख पाहुणा म्हणून आलेल्या तायडेच्या आयएएस पदाबाबत संशय वाटला. त्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तो तोतया आयएएस असल्याचे उघडकीस आले. 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!