Latest Marathi News
Ganesh J GIF

बालासोर येथील कोरोमंडल रेल्वे अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

अपघातात शेकडो लोकांचा बळी, अपघाताचे कारणही समोर, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

दिल्ली दि ८(प्रतिनिधी)- ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसच्या रेल्वे अपघात २८० हुन अधिक जणांना आपला जीव गमावावा लागला होता. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या अपघातात अनेक कुटुंबाचा विंध्वस झाला. पण आता त्या भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी सायंकाळी रेल्वेंचा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेकांना आपले प्राण गमावावे लागले. या अपघातानंतर अनेकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला आहे. सरकारने देखील या प्रकरणाची सीबीआय तपासाची घोषणा केली आहे. आता या रेल्वे अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही प्रवासी झोपलेले दिसत आहेत. तर काही प्रवासी बसलेले आहेत. सफाईकर्मी साफसफाई करताना दिसत आहे. पण अचानक एक मोठा झटका बसतो आणि रेल्वेत अंधार पसरतो. सर्वत्र आरडाओरड अन् किंकाळ्याच कानी पडू लागतात. कोणतरी प्रवाशाने हा क्षण कॅमे-यात कैद केला होता. आता तो व्हायरल होत आहे. दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलावामुळे ही दुर्घटना घडली असा निष्कर्ष समोर आला आहे.

रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना २ लाखाची घोषणा केली होती. तर रेल्वेने देखील मृतांना १० लाख मदतीची घोषणा केली होती. युद्धपातळीवर काम करून या मार्गावर पुन्हा रेल्वे धावू लागल्या आहेत. दरम्यान जबाबदार लोकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले. या घटनेसाठी जबाबदार कोण आहेत हे आता समजले आहे. तपासाचा अहवालही लवकरच मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल सूचना दिल्या होत्या, असे वैष्णव म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!