Latest Marathi News
Ganesh J GIF

राजकीय विरोधक गडाख-घुले झाले व्याही-व्याही

सोयरिकीने बदलणार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे, नगरमध्ये नात्यांचे राजकारण

अहमदनगर दि २२(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यात सगे सोय-यांचे राजकारण नवे नाही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक हे एकमेकांचे पाहुणे सुद्घा आहेत आता यात आणखी एका नव्या नात्याची भर पडली आहे.अहमदनगर जिल्ह्यात गडाख आणि घुले परिवाराचा राजकीय संघर्ष जिल्ह्यासह राज्याने पाहिला आहे. पण आता हे दोन्ही परिवार व्याही-व्याही झाले आहेत. त्यामुळे नगरच्या राजकारणात नवीन समीकरणे जन्माला येण्याची शक्यता आहे.


माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ.निवेदिता घुले यांचा आज विवाह सोहळा संपन्न झाला.या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आदित्य ठाकरे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गडाख आणि घुले परिवाराचे साखर कारखाने एकमेकांच्या जवळ आहेत. त्यामुळे दोन्ही परिवार स्थानिक निवडणुकीत नेहमीच आमने-सामने यायचे. त्याचबरोबर एवढंच नाहीतर अनेकदा आमदारकी विरोधात लढवत होते. मतदारसंघ पुनर्रचनेत घुलेंचा मतदारसंघ गडाखांच्या आणि पाथर्डी शेवगाव मतदारसंघात विलीन झाला आहे. यामुळे अनेकदा दोघात राजकीय संघर्ष देखील पहायला मिळाला आहे. पण या विवाहामुळे निवडणुकीत एकमेकांविरोधात लढणारी ही दोन घराणी आता व्याही-व्याही झालेली आहेत. त्यामुळे नगरमध्ये नवीन राजकीय समीकरणे जन्माला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


अहमदनगर जिल्ह्यात नेहमीच सोयऱ्या धायऱ्यांचे राजकारण पाहायला मिळाले आहे. उदाहरण पहायचे झाल्यास भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना तीन मुली आहेत. पहिली मुलगी काँग्रेसच्या कोतकरांच्या घरात, तर दुसरी राष्ट्रवादीचे आमदार जगतापांच्या घरात आणि तिसरी मुलगी शिवसेनेच्या गाडे परिवारात दिली आहे. त्यात आता गडाख घुले परिहाराची भर पडली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!