Latest Marathi News

अज्ञात माथेफिरुकडून मध्यरात्री वाहनांची जाळपोळ

आग लागल्याची घटना सीसीटीव्हीत कैद, आगीच्या घटनेमुळे खळबळ

नवी मुंबई दि ७(प्रतिनिधी)- पनवेल शहरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरूकडून वाहनांची जाळपोळ केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या घटनेमध्ये एक ट्रॅक्टर, तीन दुचाकी गाड्या आणि एका रिक्षाला आग लावण्यात आलेली आहे. यामुळे नागरिकांना नुकसानीबरोनर मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पनवेल शहरातील नंदनवन कॉम्प्लेक्स येथील सप्तगिरी बार समोर उभी असलेले एक मोटारसायकल, पटेल हॉस्पिटल शेजारी अनिल झेरॉक्स येथे पार्क करून ठेवलेल्या तीन मोटारसायकली तसेच जोशी आळी परिसरात असलेली एका रिक्षाला आणि आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील पार्किंगमध्ये उभा असलेला एका ट्रॅक्टरला आग लावली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके रवाना झाली अद्याप आग लावणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला नसून तो माथेफिरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्क करून ठेवलेली पाच वाहने अज्ञात इसमाने जाळल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पनवेल शहरामध्ये वेगवेगळ्या वाहनांना आग लावलेला इसम कोण होता? हे अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!