घरात बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसतायत’
शिंदे- फडणवीस सरकारच्या नाराजी नाट्यावर 'या' महिला नेत्याची टिका
मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून रोज नवीन वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे विरोधक सातत्याने त्यांच्यावर टीका करत असतात, मंत्रिपदाच्या वाटपानंतरही नेत्यांमध्ये वाद होत आहेत. या वादावर सुप्रिया सुळेंनी शेलक्या शब्दात सरकारवर टिका केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अडीच वर्षात आमची सत्ता गेली. पुढील अडीच वर्षानंतर निवडणुका लागतील. मात्र सध्या शिंदे-भाजप यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत. घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगत आहेत, सुळे यांनी आधीही मंत्रिमंडळात महिलांना स्थान न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. मंत्रीमंडळ विस्तारानंतर कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज आहेत . त्यामुळे ह धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी सरकारला टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकाचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले आहे. यामध्ये महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्यानंतर मंत्रिपद मिळूनही कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे काही मंत्री नाराज आहेत. दादा भुसे, दीपक केसरकर,संदीपान भुमरे,सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.