
मुंबई दि ८ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र भाजपमध्ये आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद होण्याची शक्यता आहे. सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या जागी मतदानाचा मराठा टक्का लक्षात घेऊन मराठा नेत्याकडेच प्रदेशाध्यक्षपद राहावे, अशी भाजप श्रेष्ठींची इच्छा आहे.
आशिष शेलार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. आशिष शेलार यांनी याआधी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे संभाळली होती. आशिष शेलारांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीतही आशिष शेलार यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना प्रदेशाध्यक्ष पदासाठी भाजपाने मराठा कार्ड खेळवले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून याआधीच मराठा मुख्यमंत्रीची खेळी भाजपाने खेळली आहे.
तत्पूर्वी मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील यांना फोन करण्यात आले आहेत. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, संदिपान भुमरे, भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनाही फोन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.