Latest Marathi News
Ganesh J GIF

विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागितली शिवसेनेची घटना

आमदार अपात्रतेबाबत लवकरच निर्णय? पण झिरवळकरांनी निकालच सांगून टाकला म्हणाले..

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेची घटना मागवली आहे.

न्यायालयाच्या निकालानुसार जुलै २०२२ पूर्वी सेना कोणाची होती. यावर निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेची घटना मागवली आहे. त्यामुळे या निर्णयप्रक्रियेला वेग आला आहे. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने याच मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. ठाकरे गटाचे हे दुसरे निवेदन असल्याने अध्यक्ष नार्वेकर यांनी कार्यवाहीला सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे, शिंदे गटाऐवजी निवडणूक आयोगाकडून घटना मागवली आहे. त्यांच्याकडून माहिती आल्यानंतर कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटावर ताशेरे ओढत, प्रतोद, गटनेते बेकायदेशीर ठरवले होते. तसेच अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षावर दावा करता येणार नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण या निर्णयावर नोंदवले आहे. ही निरीक्षणे लक्षात घेऊनच राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र, अध्यक्ष नार्वेकर यांनी कारवाईला वेळेचे बंधन नसणार आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी हिरवळ यांनी मात्र नार्वेकर यांना टोला लगावला आहे. तपासण्या करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नाही. न्यायालयाने दहा ते बारा त्रुटी स्पष्ट केल्या आहेत. या सगळ्या विरोधात आहेत. फक्त एकच शिल्लक राहिले आहे ते तपासणी करण्यासाठी नार्वेकरांकडे दिले आहे. तपास कधीपर्यंत चालेल याची काहीच खात्री नाही. लवकरात लवकर ही राजकीय व्यासपीठावरील किंवा सभागृहातील भाषा आहे. अगदी सहा महिन्यांनंतरही लवकरच असते, असा खोचक टोला नरहरी झिरवळांनी लगावला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!