Latest Marathi News

खरच! या राज्यात ४ जूनपर्यंत चिकन-मटणची विक्री बंद राहणार

मटन खाल्ल्यास इतक्या रूपयांचा दंड, या कारणामुळे मांसविक्रीवर बंदी

सिक्कीम दि २७(प्रतिनिधी)- मासांहार हा आज अनेकांच्या जेवणातला मुख्य घटक बनला आहे. पण आता भारतातील सिक्कीम सरकारने मांस विक्रीवर काही दिवस बंदी घातली आहे. राज्यातील सर्व मटन चिकनची दुकाने २७ मे ते ४ जूनपर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

बौद्ध कॅलेंडरचा शुभ महिना सागा दावा सुरू झाला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ विवाह समारंभ, सामाजिक कार्ये आणि प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना खाद्य देण्याच्या संदर्भातच बाहेरून मांस आयात करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. त्यासाठी आदेश देणाऱ्यांना विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. माशे विक्रीवर बंदी नसली तरी धार्मिक भावनांचा सन्मान करत मासे विकू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. महत्वाचे म्हणजे सरकारच्या या आदेशाचं उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. सिक्कीम सरकारमधील धर्मशास्त्र विभागाने हे आदेश दिले आहेत. राज्यातील तिबेटियन लोक बौद्ध कॅलेंडरचे पालन करतात.

सागा दावा महिन्यात लोक प्रार्थना करतात, दान करतात, धार्मिक कार्य करतात, लोण्याचे दिवे लावतात, तीर्थयात्रा करतात आणि महत्त्वाचे म्हणजे या महिन्यात मांसाहार देखील वर्ज्य करतात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!