वयाच्या ६० व्या वर्षी या अभिनेत्याने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ
सोशल मिडीयावर लग्नाचे फोटो व्हायरल, म्हणाले आयुष्याच्या या वळणावर लग्न...
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी चक्क वयाच्या ६०व्या वर्षी लग्न केले आहे. कोलकाता येथील एका क्लबमध्ये आसामची फॅशन उद्योजका रुपाली बरुआसोबत त्यांनी रजिस्टर्ड लग्न केले आहे. मोकळ्या लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले.

आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी विवाह करत नव्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे. आशिष आणि रुपाली यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जवळील नातेवाईक आणि मित्रांसाठी लग्नानंतर रिसेप्शन ठेवण्यात आले असल्याची माहिती आशिष विद्यार्थी यांनी दिली आहे. लग्नानंतर आशिष यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “रुपालीशी या वयात लग्न करणं, हे फिलिंग खूपच छान आहे. आम्ही सकाळी कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केले. संध्याकाळी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे”, अशी माहिती त्यांनी दिली आहे. आशिष विद्यार्थी यांचं हे दुसरं लग्न आहे. अगोदर त्यांनी राजोशी विद्यार्थी यांच्याशी विवाह केला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. रूपाली बरूआ या फॅशन जगताशी संबंधित असून त्या एका फॅशन स्टोअरच्या मालकीन आहेत. लग्नाविषयी आशिष यांची पत्नी रुपाली म्हणाल्या की, ”आम्ही काही दिवस आधीच भेटलो आणि आमच्या नात्याला पुढे न्यायचं ठरवलं. आम्हाला दोघांना हे लग्न खूप साधेपणानं व्हावं असं वाटत होतं” असे सांगितले.
आशिष विद्यार्थी यांनी ११ हून अधिक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर २०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांना त्यांच्या खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखलं जाते. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘गूडबाय’ सिनेमात ते दिसले होते.