‘औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’
भाजपा नेत्याची शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टिका, टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांवर आपली प्रतिक्रिया दिली. “देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता वाटते” असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधान आले आहे. पण त्यातच भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांची थेट औरंगजेबाशीच तुलाना केली आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे की, निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात, कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार. आता या ट्विटमुळे काय-काय वाद निर्माण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्यये घटना घडली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्येही काही झालं. कुणी तरी मोबाईलवर मेसेज पाठवला. चुकीचा असेल, नाही असे नाही. पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरूप देणं योग्य नाही. सत्ताधारी वर्ग अशा गोष्टीला प्रोस्ताहित करतो. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. पण राज्यकर्त्येच रस्त्यावर उतरायला लागले, त्यांचे सहकारी उतरायला लागले तर दोन समाजात जातीय कटुता निर्माण होत आहे. ते योग्य नाही. असे शरद पवार म्हणाले होते.
अहमदनगरमधील मुकुंदनगर भागातील संदल उरुस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर शिवराज्याभिषेक दिनी समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरातील वातावरण तापले आहे.