Latest Marathi News
Ganesh J GIF

कमालच! एका महिलेने चक्क दोन सख्ख्या भावांशी लग्न

महिलेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, गळ्यात चालते दोन मंगळसूत्र

महाभारतात द्रोपदीने पाच पांडवांशी लग्न केल्याची घटना आपल्या सर्वांना माहित आहे. पण आजच्या जगात ते अशक्य आहे. पण सध्या कलियुग सुरु आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते. कारण महाभारतातील द्रोपदीप्रमाणे एका महिलेने चक्क दोन भावांशी लग्न केले आहे. याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दोन भावांशी लग्न केलेल्या महिलेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यात ती दोन पतींबरोबर दिसत आहे. विशेष म्हणजे तिने गळ्यात दोन मंगळसूत्र घातले आहेत. एका व्यक्तीने त्यांची मुलाखत घेतली यावेळी मुलाखतदाराने विचारलं की, हे दोघं कोण आहेत. यावर महिला म्हणली ‘एक पहिला पती आहे तर एक दुसरेपण पती आहेत आणि हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मंगळसूत्राबाबत ती म्हणाली की, ‘एका नवऱ्यासाठी एक मंगळसूत्र आहे, तर दुसऱ्या नवऱ्यासाठी दुसरं. दोन पती आहेत तर दोघांसाठी दोन मगळसूत्र घालणं गरजेचं आहे. यावर मुलाखतदाराने विचारलं की तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करता? त्यावर आम्ही कुठेही जाताना एकत्रच जातो. एकत्र राहतो, एकत्र खातो, एकत्र झोपतो.’ असे उत्तर महिलेने दिले आहे. हा व्हिडीओ @digitalbharat563 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून एक पत्नी के दो दो पती असं कॅप्शन याला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खरा आहे की प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

एक पत्नी आणि दोन पतींचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने ‘घोर कलयुग आहे.’ म्हटले तर दुसऱ्याने ‘आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं’ अशी कमेंट केली. तर काहींनी ‘यांना तुरूंगात टाका’ अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!