कमालच! नवऱ्याने टोमॅटो वापरल्याने पत्नी घरच सोडून गेली
पत्नी न सापडल्याने पतीची पोलिसात तक्रार, टोमॅटोच्या दराने पतीचा संसार उद्ध्वस्त, नेमके प्रकरण काय?
भोपाळ दि १३(प्रतिनिधी)- देशात सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे वाढत असलेले दर पाहता सामान्य कुटुंबातील व्यक्तींनी भाजीत टोमॅटो टाकणे बंद केल आहे. पुण्यात तर टोमॅटोच्या दरावरून ग्राहक आणि दुकानदार यांच्यात हाणामारी देखील झाली होती. पण मध्यप्रदेशमध्ये तर टोमॅटोमुळे पत्नीच नवऱ्याला सोडून गेली आहे.
मध्य प्रदेशातील शाहदोल जिल्ह्यात मोठी घटना समोर आली आहे. संजीव बर्मन हा आपल्या पत्नीसोबत खानावळीचा व्यवसाय करतो. काही दिवसांपूर्वी जेवण तयार करताना संजीवने पत्नीला न विचारता दोन टोमॅटोचा वापर केला होता. याच कारणातून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. त्यामुळे रागावलेली पत्नी मुलीसह घर सोडून निघून गेली. संजीवने बायको आणि मुलीला खूप शोधले. नातेवाईंकडे देखील चाैकशी केली. पण ती सापडली नाही. यानंतर संजीने पत्नी आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. याबाबत संजीव म्हणाला की, जेवण बनवत असताना दोन टोमॅटोचा वापर केल्याने पत्नीबरोबर वाद झाला. त्यानंतर रागाने पत्नी मुलीसह घर सोडून गेली. गेली तीन दिवस झाले पत्नीशी कोणताही संपर्क झाला नाही. अथवा तिच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती मिळाली नाही. पोलिसांनी संजीवला त्याची बायको आणि मुलगी शोधून घरी आणून सोडू असं आश्वासन दिले आहे. दरम्यान या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे.
टोमॅटोचे दर वाढले असून सर्वसामान्यांना परवडेनासा झाला आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचं आर्थिक बजेटही कोलमडले आहे. त्यामुळे घरातून सध्या टोमॅटो गायब झाला आहे. टोमॅटोचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने कृषी विभाग दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.