कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे मंत्रीपदासह आमदारकीही जाणार?
निवडणुक लढवण्यावरही बंदी येण्याची शक्यता, अब्दुल सत्तार मंत्रिपदाचा राजीनामा देणार?, हे कारण समोर?
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अब्दुल सत्तार यांची कायम साथ राहिलेली आहे. ते अनेक वादात अडकले असतानाही सत्तार यांना कृषीमंत्री केले. पण वादात अडकणारे अब्दुल सत्तर हे कोणत्या ना कोणत्या वक्तव्याने चर्चेत असतात. मात्र न्यायालयाच्या निर्णयाने सत्तार यांना मोठा दणका दिला आहे. त्यामुळे सत्तार यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे मंत्रिपदासह आमदारकी धोक्यात आली आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून खटला चालवण्याचे आदेश सिल्लोड कोर्टाने दिले आहे. अब्दुल सत्तार यांनी सन २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. सिल्लोड कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जर सत्तार यांना दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर सत्तार यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय सत्तार यांनी सहा वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र ठरवण्यात येऊ शकते. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला मालमत्तासंदर्भात खोटी माहिती दिली होती, असा आरोप महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी केला होता. याबाबत २७ ऑक्टोबर २०२१ रोजी याचिकाही दाखल करण्यात आली होती. अब्दुल सत्तार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली होती, हे समोर आले आहे. अब्दुल सत्तार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत मोठी तफावत आढळून आल्याचे सिल्लोड कोर्टाने म्हटले आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध सिल्लोड कोर्टाने खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात कोकणातील काही भाग वगळता राज्यात समाधानकारक पाऊस नाही. काही तालुक्यांमध्ये पडलेल्या पहिल्या रिमझिम पावसावर शेतकर्यांनी पेरण्या केल्या आहेत; तर अनेक ठिकाणच्या शेतकर्यांनी पाऊस पडेल, या आशेवर बियाणे घेऊन ठेवले आहे. आगामी काळात याचे खापर सत्तार यांच्यावर टिका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तार देखील कृषीमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.