ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण
या गटाकडे संशयाची सुई? सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल, राज्यातील राजकारण तापणार?
ठाणे दि १७(प्रतिनिधी)- ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक केल्याची घटना कळव्यात घडली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पोळ यांनी सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. यापूर्वीही त्यांना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून धमकी देण्यात आली असल्याचा आरोप आहे. आता थेट शाईफेक आणि मारहाण करण्यात आल्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
कळव्यातील मनीषा नगर येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त ठाकरे गटाकडून कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास सुषमा अंधारे, खासदार राजन विचारे आणि जिल्हा अध्यक्ष केदार दिघे हे देखील कार्यक्रमास उपस्थित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यावेळी महापुरुषांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला म्हणून स्थानिक महिलांनी पोळ यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर त्यांना मारहाण करत अंगावर मोठ्या संख्येने धावून आल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्लानंतर अयोध्या पोळ यांनी ट्विट करत या हल्ल्यासाठी सापळा रचण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो शिवसैनिक माझ्या सोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली सर्वांनी. असं ट्विटमध्ये पोळ यांनी म्हटलं आहे. पोळ यांनी या प्रकरणानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन बाहेर आल्यानंतर पोळ काही यांना पुन्हा काही महिलांनी मारहाण केली असल्याची घटना घडली आहे.
मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे #संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन… pic.twitter.com/YKMQWbiFAr
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) June 17, 2023
अयोध्या पोळ यांना हा कार्यक्रम ठाकरे गटाचा म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र हा ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून सापळा रचण्यात आला असल्याचे शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ठाकरे गटाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. असा हल्ला झाला म्हणून मी घाबरणार नाही. मी माझे काम करतच राहणार, असे पोळ यांनी सांगितले आहे.