Latest Marathi News
Ganesh J GIF

फेसबुक, इन्स्टाग्रामवर आता बातम्या शेअर करण्यास बंदी

अगोदरच्या न्यूज लिंकही हटवण्यात येणार, या कारणामुळे फेसबुक इन्स्टाची नाराजी, सोशल मीडिया युजर्सना धक्का

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- फेसबुक अर्थात मेटाने एक मोठा निर्णय घेत फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का दिला आहे. कारण आता या दोन्ही अॅपवर बातम्या शेअर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच आधीच्या बातम्यांच्या लिंक देखील हटवण्यात येणार आहेत. पण घाबरू नका हा निर्णय कॅनडासाठी घेण्यात आला आहे. आता कॅनडातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्स दोन्ही प्लॅटफॉर्मवर बातम्या किंवा लिंक पाहू शकणार नाहीत.

सोशल मीडिया कंपन्यांना बातम्यांच्या बदल्यात वृत्त प्रकाशकांना पैसे द्यावे लागतील असा कायदा कॅनडात करण्यात आला आहे. या कायद्याच्या निषेधार्थ मेटाने हा निर्णय घेतला आहे. कॅनडात केलेला कायदा हा फेसबुक, गुगल आणि ट्विटरसह सर्व सोशल मीडिया कंपन्यांना लागू होणार आहे. त्यामुळे गुगलने देखील असाच इशारा स्थानिक सरकारला दिला आहे. मेटाने कॅनडातील फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या बातम्या ब्लॉक केल्या आहेत. जगभरातील अनेक लोक सोशल मीडियाचा वापर फक्त बातम्यांसाठी करतात. पण आता मात्र कॅनडातील युजर्स याला मुकणार आहेत. कदाचित या निर्णयामुळे मेटाचे वापरकर्ते कमी होण्याची शक्यता आहे. किंवा सरकारला आपला निर्णय मागे देखील घ्यावा लागू शकतो बातम्यांच्या लिंक ब्लॉक करण्याची सुरुवात मंगळवारपासून झाली आहे. काहींनी फेसबुकवर न्यूज पाहिल्याचा दावा केला आहे. तर अनेक युजर्सनी बातम्यांच्या लिंक दिसत नसल्याचाही दावा केला आहे.

आजच्या युगात सोशल मीडिया लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लोक दिवसातील अनेक तास सोशल मीडियावर गुंतलेले असतात. सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठीच नाही तर माहितीसाठीही करतात. पण कॅनडात आता यावर बंदी असणार आहे. पण सध्या तरी केवळ कॅनडा देशामध्येच ही कारवाई करण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!