जयंत पाटील भावी मुख्यमंत्री म्हणत मुंबईत बॅनरबाजी
कार्यकर्त्यांचा उत्साह की अजितदादा जयंत पाटील संघर्ष, चर्चांना उधान
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी हा नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पण या पक्षात प्रत्येक नेत्याचा एक गट आहे. त्यामुळे इथे नेहमीच गटातटाचे राजकारण पहायला मिळते. काही दिवसापूर्वी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी चर्चा सुरु असताना आता जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधान आले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त नेपियन्सी रोडवर एका कार्येकर्त्याने बॅनर लावले आहेत. बॅनरवर जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे. राष्ट्रवादीत अजित पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे ही प्रमुख नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असतात. पण त्यात पाटील यांच्या नावाची भर पडली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मलबार हिल तालुका यांच्याकडून हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनरवर जयंत पाटलांचा उल्लेख बॉस असाही करण्यात आला आहे. अजित पवार यांचा आक्रमकपणा, सुप्रिया सु़ळे यांचा राज्यातील राजकारणातला नवखेपणा यामुळे जयंत पाटील कदाचित राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरु शकतात. जयंत पाटील यांच्यामागे किती आमदार आहेत, हा संशोधनाचा विषय असला तरीही शरद पवारांचे पाठबळ मिळाल्यास जयंत पाटील यांची बाजू भक्कम होऊ शकते. पण अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात संघर्ष असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे निलेश लंके यांच्या अजित पवार मुख्यमंत्री या विधानाला उत्तर म्हणून जयंत पाटील भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले असल्याची देखील शक्यता आहे.
या बॅनरबाबत जयंत पाटील याना विचारलं असता ते म्हणाले, “मी अजून ते बॅनर्स बघितले नाही, प्रसारमाध्यमातून मला हे समजते आहे. काही कार्यकर्ते उत्साहाच्या भरात काहीतरी करतात. आपण सगळीकडेच लक्ष्य दिले पाहिजे असे नाही. मी कधी कोणाला बॅनर्स लावायला सांगत नाही असं जयंत पाटील म्हणाले आहेत. अर्थात यावर अंतिम योग्य निर्णय शरद पवारच घेऊ शकतात.असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.