Latest Marathi News
Ganesh J GIF

चाकणच्या मुख्य बाजारपेठेत बिबट्याचा धुमाकूळ

नागरिकांची तारांबळ, शहरात संचारबंदी, बिबट्या जेरबंदचा थरार कॅमे-यात कैद

चाकण दि १६(प्रतिनिधी)- चाकण शहराच्या मध्यवस्तीत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट परसरली होती. वन विभाग तसेच रेस्क्यू टीमच्या मदतीने पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. पण त्यामुळे बाजारपेठेत मात्र अघोषित बंद सारखी स्थिती होती.

खेड तालुक्यातील चाकण शहरात मध्यवस्तीत बिबट्या आढळून आला होता.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्या आल्याने चाकणमधील बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. तसेच शेजारी असलेल्या शाळेतील मुलांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. एकंदरीत चाकणमध्ये संचारबंदी सारखी स्थिती निर्माण झाली होती.बिबट्या चाकण येथील बाजारपेठेच्या भागात एका पडक्या घराच्या आडोशाला जाऊन बसला होता. वनविभागाला याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तो बिबट्या असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर भुलीचे इंजेक्शन मारल्यानंतर काही वेळ सैरभैर झालेल्या बिबट्याला जागेवरच थांबविण्यात वन विभाग आणि चाकण पोलिसांच्या उपाययोजनांना यश आले.बिबट्याला पकडल्यानंतर सर्वांनी रेस्क्यू टीम आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे टाळ्या वाजवून कौतुक करण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कुणीही जखमी झाले नाही. बिबट्याला पकडण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान चाकण शहरात बिबट्या आल्याची मागील अनेक वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.

 

पुणे जिल्ह्यात बिबट्या मानवी वस्तीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता शहरी भागातही बिबट्या दिसू लागला आहे. हा बिबट्या रोहकल किंवा लगतच्या ऊसशेती असलेल्या भागातून आला असण्याची शक्यता आहे. बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!