Latest Marathi News
Ganesh J GIF

“बापु”ज डायरी आठवणीतल्या चार गोष्टी पुस्तकाचा शनिवारी प्रकाशन सोहळा

अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर प्रविण पाटील यांच्या हस्ते होणार संपन्न

लोणी काळभोर प्रतिनिधी – चंद्रकांत दुंडे |  प्रिंट व डिजिटल मिडीया पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाप्पू काळभोर यांनी लिहिलेल्या “बापु”ज डायरी आठवणीतल्या चार गोष्टी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.१६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता थेऊर फाटा येथील एस.फोर.जी हॉटेल याठिकाणी अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर प्रविण पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघाचे हवेली तालुका अध्यक्ष संदिप बोडके यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यअधिकारी मंगेश चिवटे उपस्थित राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी एल स्वामी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघाचे हवेली तालुका पत्रकार बांधवाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जेष्ठ पत्रकार पंकज केळकर यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असल्याने संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष जनार्धन दांडगे, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काळभोर,राज्य खजिनदार विजय काळभोर जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, जेष्ठ सल्लागार प्रभाकर क्षिरसागर, तुळशीराम घुसाळकर, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत दुंडे,तालुका सरचिटणीस अमोल अडागळे, तालुका सदस्य रियाज शेख, पप्पू चिकणे, विशाल कदम, सुधीर कांबळे, राजेंद्र हसगुडे, गोरख कामठे आदी पत्रकार उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!