बावनकुळेंचे भाषण संपेना भाजप नेत्यांना झोपही आवरेना
बाबकुळेंचे भाषण लांबल्याने भाजपा नेते स्टेजवरच झोपले, व्हिडिओ तुफान व्हायरल
ओैरंगाबाद दि १३(प्रतिनिधी)- औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषद निवडणुकीसाठी नुकतीच एक प्रचार सभा झाली होती. मात्र बावनकुळेंच्या प्रचारसभेपेक्षा एका वेगळ्या गोष्टीची सध्या चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु आहे, व्यासपीठावर डुलक्या घेणा-या भाजप नेत्यांची. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे हे भाषण करत असताना भाजपच्या मंत्र्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण झोपल्याचे पहायला मिळाले आहेत. याचा व्हिडिओही जोरदात व्हायरल झाला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने भाजप शिक्षक परिषद उमेदवार प्रा. किरण पाटील यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरेंसह अनेक खासदार पदाधिकारी उपस्थित होते. पण जेव्हा बावनकुळे यांचे भाषण सुरू झालं त्यावेळी भाजप नेते अक्षरशः डुलक्या घेताना पाहायला मिळाले. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना आळस येत होता, सहकारमंत्री अतुल सावे चक्क डोळे लावून डुलक्या घेत होते. तर भाजपचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचे देखील डोळे लागले होते. तर अनेक पदाधिकारी देखील झोपले होते. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्हिडिओ ट्विट करून लिहिले आहे की,”हे आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे ! जे बारामतीत जाऊन घड्याळ बंद पाडणार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या स्टेजवर त्यांच्या भाषणाचा आनंद लुटताना केंद्रीय मंत्री भागवत जी कराड व माननीय मंत्री श्री अतुलजी सावे. “अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओमुळे सध्या खूप खळबळ माजली आहे. भर सभेत नेते खरंच झोपा काढत होते का ? की यात काही एडिटींग करुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हे आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे !
जे बारामतीत जाऊन घड्याळ बंद पाडणार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या स्टेजवर त्यांच्या भाषणाचा आनंद लुटताना केंद्रीय मंत्री भागवत जी कराड व माननीय मंत्री श्री अतुलजी सावे. pic.twitter.com/WKbrKEHNNN— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 13, 2023
बावनकुळे भाषण करत असताना भाजपच्या मंत्र्यांपासून ते पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर डुलक्या मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बावनकुळे यांनी हा व्हिडिओ तपासून पाहू असे सांगत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. पण आपल्या प्रदेशाध्यक्षांच्या सभेलाच महत्वाच्या नेत्यांनी घेतलेली डुलकी चर्चेचा विषय ठरली आहे.