Latest Marathi News
Ganesh J GIF

ठाकरे गटाच्या बीड जिल्हा अध्यक्षांची सुषमा अंधारेंना मारहाण?

सुषमा अंधारेंकडून मात्र वेगळाच दावा, ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर, विरोधकांचा टोला

बीड दि १९(प्रतिनिधी)- शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत. एवढच नव्हे तर सुषमा अंधारेंच्या दोन कानशिलात ठेवून दिल्याचंही ते म्हणाले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्याकडून मारहाण करण्यात आली आहे. याबद्दल जाधव यांनी कबुली दिली आहे. यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पैसे मागत असल्याचा धक्कादायक आरोप केला. त्यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जाधव यांनी एका व्हिडीओमध्ये सांगितले की, ‘बीडमध्ये ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेचं आयोजन कऱण्यात येत होत. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी ही सभा होणार आहे. या सभेची पाहणी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह उपनेत्या सुषमा अंधारे देखील आल्या होत्या. त्या आमच्या पदाधिकाऱ्यांकडे एसी, सोफ्यासाठी हे पैसे त्या मागत आहेत. त्या माझ पदही विकायला लागल्या आहेत. मी पक्ष वाढीसाठी अत्यंत प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वादात मी त्यांना दोन चापटा मारल्या. अशी कबुली बीडमध्ये ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी दिली आहे. तर दुसरीकडे अंधारे यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. अंधारे म्हणाल्या, ‘जाधव यांचे सर्व दावे खोटे आहेत. बॅनरवर फोटो नसल्याने जाधव रागात होते. मला मारहाण करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून एक सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जाधव यांची आधीपासूनच चिडचिड चालली होती. आमच्या पक्षाचे विनायक मुळे पदाधिकारी आहेत. त्यांनी जाधव यांचा फोटोच बॅनरवर छापला नाही. त्यामुळे ते चिडले होते. ते त्यांनी माझ्यासोर बोलून दाखवले. मी जिल्हाप्रमुखांना सांगितले फोटो लावून घ्या. ते म्हणाले, ताई आपण हे सर्व नंतर बोलू या.’ पण नंतर एका मुला बरोबर जाधव यांची बाचाबाची झाली असे अंधारे म्हणाल्या आहेत.

अंधारे यांच्यावर मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर विरोधी पक्षांकडून ठाकरे गटाला टार्गेट करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!