Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नाच्या आधीच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा होणार आई

गुडन्यूज देत शेअर केले सुंदर फोटो!, हा अभिनेता होणार पुन्हा बाबा, फोटो व्हायरल

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील आणखी एक अभिनेत्री लग्नाआधीच आई बनणार आहे, तेही दुस-यावेळी त्यामुळे जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आपल्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.

अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रीएलाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दुसऱ्या प्रेग्नंसीची माहिती दिली आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हिने शनिवारी सोशल मीडियावर तिची दुसरी प्रेग्नेंसी जाहीर केली आहे. मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मॅटर्निटी फोटोशूटमधील एक फोटो शेअर करत दुसर्‍या गरोदरपणाची माहिती दिली आहे. ती अभिनेता अर्जुन रामपालला डेट करत असलायची चर्चा आहे, आणि या जोडप्याना अगोदरच ३ वर्षांचा मुलगा आहे. गॅब्रिएलाने स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. तिने फोटो शेअर करत असताना गॅब्रिएलाने “हे खरंच आहे की एआय आहे?” असं कॅप्शन दिले आहे. गॅब्रिएला फोटोमध्ये अत्यंत देखणी दिसत आहे. गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आणि अर्जुन रामपाल हे पाच वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहेत. ते आई-वडिल म्हणून त्यांचा मुलगा एरिकशी प्रेम देत आहेत.गॅब्रिएला डेमेट्रिएड्स ही सौंदर्यवती मॉडेल आहे. अनेक जाहिरीती आणि सिनेमातून तिने आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे. सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. दरम्यान लवकरच, गॅब्रिएला आणि अर्जुन दोघेही एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. गॅब्रिएला एका ब्रिटिश-भारतीय पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, जी अर्जुनच्या चारित्र्याची चौकशी करत असते. त्याच्या व्यक्तिरेखेचा तिच्यावर क्रश आहे, चित्रपटात त्यांच्यात एक रोमँटिक अँगल देखील असणार आहे.

फोटो शेअर होताच इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी कमेंट केश्नमध्ये भरपूर प्रतिसाद देत अभिनंदनाचा वर्षाव केला. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले, ‘रामपाल कुटुंबाचे अभिनंदन’. दुसर्‍याने म्हटले, ‘अभिनंदन गॅब्रिएला!! देव तुम्हाला आशीर्वाद देईल.’ एमी जॅक्सन, काजल अग्रवाल, मलायका अरोरा, मौनी रॉय आणि दिव्या दत्ता यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी तिचे अभिनंदन केले आहे. दरम्यान अर्जुन रामपालला त्याची माजी पत्नी सुपरमॉडेल मेहर जेसिया हिच्यासोबत माहिका आणि मायरा ही दोन मुले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!