
सावधान! चिकन खाताय का? मग ही बातमी वाचाच!
राज्यात या रोगामुळे हजारो कोंबड्यांचा मृत्यू, ही लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरकडे जा, अन्यथा...
मुंबई – राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव वाढल्याने चिंता वाढली असून, हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पशुविभागाकडून राज्यात बर्ड फ्लूचा हाय अलर्ट देण्यात आला आहे . त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांची चिंता वाढली आहे. तसेच हाॅटेल व्यावसायिक देखील चिंतेत आहेत.
कारंजा तालुक्यातील खेर्डा (जिरापुरे) येथे ‘बर्ड फ्लू’ने (Bird Flu) तब्ब्ल ७ हजार ५५२ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रयोगशाळेने २७ फेब्रुवारी रोजी प्रशासनाला दिलेल्या पत्रातून बर्ड फ्लूचे निदान करण्यात आले आहे. बर्ड फ्ल्यू झालेल्या पक्षी व प्राण्यांमधून त्याचा संसर्ग व्यक्तीलाही होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला आहे. वाशिममध्ये विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोल्ट्री फार्ममधून कोंबड्यांची विक्री बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क केले असून बर्ड फ्लूच्या लक्षणांची माहिती गोळा करण्याचे आवाहन केले आहे. बर्ड फ्लूचा कहर रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या देखरेखीखाली विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच धोकादायक म्हणजे प्राण्यानंतर आता माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. कारण धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संशयित रुग्ण सापडला आहे. ढोकी गावात माणसाला बर्ड फ्लू झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ढोकी गावच्या १० किमी परिघातील परिसर अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. सतत खोकला, उच्च ताप, डोकेदुखी, सतत नाक वाहणे, पचनाच्या तक्रारी (उलट्या , मळमळ , जंत होणे ), घशात सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळे दुखणे, अतिशय थकवा जाणवणे ही लक्षणे आढळल्यास त्वरित डाॅक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच चिकन खाताना गुणवत्ता तपासूनच खरेदी करावे असे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.
बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएन्झा म्हणूनही ओळखले जाते. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो केवळ पक्ष्यांनाच संक्रमित करत नाही तर हा विषाणू मानव आणि इतर प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो. यातील बहुतेक विषाणू पक्ष्यांपर्यंतच मर्यादित असले तरी पक्ष्य्यांसाठी आणि काहीप्रमाणात माणसासाठी हा रोग प्राणघातक आहे.