Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! पुढील ४८ तासात स्वतः च्या देशात चालते व्हा!

पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे पाच मोठे निर्णय, पाकिस्तानची गोची, 'यामुळे' पाकिस्तानची आगपाखड

दिल्ली – म्मू-कश्मीरात पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून, सर्वत्र संतापाची लाट आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली. यात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर थेट आरोप केला असून पाकिस्तानी दूतावास बंद करण्यास सांगितले आहे आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा बंद करण्यात आला असून एका आठवड्यामध्ये भारतातील पाकिस्तानच्या राजकीय अधिकाऱ्यांनी देश सोडावा, असा आदेशही देण्यात आला आहे. भारतातील पाकिस्तानी उच्च आयोग बंद करण्यात आला असून अधिकाऱ्यांना पाकिस्तानात माघारी जाण्याचे आदेश दिले आहेत. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. भारतातील सर्व पाकिस्तानी लष्करी सल्लागारांनाही एका आठवड्याच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. भारताने इस्लामाबादमधून सल्लागारांनाही परत बोलावले आहे. उच्चायुक्तालयांची एकूण संख्या ३० पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९६० साली लागू झालेला सिंधू पाणी करार भारताने स्थगित केला आहे. पाकिस्तानवर याचा मोठा परिणाम होणार आहे, अटारी सीमा बंद करण्यात आलेली आहे. भारतीय नागरिक पाकिस्तानमध्ये असतील तर त्यांनी १ मेपर्यंत माघारी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विक्रम मिस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७ लोककल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी कॅबिनेट सुरक्षा समितीची सुमारे अडीच तास बैठक झाली. सीसीएच्या बैठकीत पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार पाकिस्तान सीमापार दहशतवादाला विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. तसेच पंजाबच्या अटारी येथील एकात्मिक तपासणी चौकी तात्काळ बंद केला जाईल. ज्यांनी कायदेशीररित्या सीमा ओलांडली आहे त्यांना १ मे पूर्वी त्या मार्गाने परत येता येईल. त्याचप्रमाणे सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. यासोबतच सैन्याच्या तिन्ही दलांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मिस्त्री यांनी सांगितले आहे. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी होणार असून सीमा बंद झाल्यामुळे पाकिस्तानचे आर्थिक नुकसान होणार आहे.

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘एक्स’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मला भारतातील पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स अकाउंट ब्लॉक करण्याची विनंती केली होती. त्यानंतर एक्सने पाकिस्तान सरकारचे अकाउंट ब्लॉक केलं आहे. यानिमित्ताने भारत सरकारने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केल्याचे बोलले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!