Latest Marathi News
Ganesh J GIF

दिल्लीमधून मोठी बातमी समोर ; फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत मोठा निर्णय

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.मला विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मंत्रिमंडळातून मोकळ करा अशी विनंती त्यांनी भाजप नेतृत्वाला केली होती. त्यानंतर या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजप कोअर गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, पियुष गोयल हे नेते उपस्थित होते.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत राज्याच्या कोअर गटाच्या झालेल्या बैठकीतून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की राज्यात कुठलाही बदल होणार नाही. जवळपास दोन तास भाजप मुख्यालयात ही बैठक चालली. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने रणनीती निश्चित करण्यात आली असून, या रणनीतीवर महायुतीच्या घटक पक्षांसोबत विस्ताराने चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय झाला? असा प्रश्न विचारला असता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर दिलं. ‘कोणताही बदल होणार नाही. पुन्हा एकदा एनडीएचं महायुतीचं सरकार मजबुतीने महाराष्ट्रात आणायचं आहे, कोणताही बदल होणार नाही’, असं पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!