Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवारांना बळीचा बकरा करतेय भाजप , उत्तर प्रदेशमधील अपयशाला जबाबदार कोण ? – जितेंद्र आव्हाड

अजित पवार यांना भाजप बळीचा बकरा करू पाहत आहे. भाजपने उत्तर प्रदेशात मोदींना कमी मतं मिळाली, याला अजित पवार जबाबदार आहेत का? याचं उत्तर द्यावं. भाजपची मत संख्या कमी झाली, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांना कमी मते मिळाली. तिथं काय अजित पवार होते का? छोट्या छोट्या कारणाने टिव्हीवर बोलणारी माणसं आता कुठे गेली? ऑर्गनायजरबाबत ते बोलत नाहीत. इकडून तिकडे उडाया मारणारे बोलूच शकत नाहीत. ज्यांना अजित पवार यांनी मोठं केलं, त्यांनी तरी किमान बोलायला हवं, असेही आव्हाड म्हणाले.छगन भुजबळ यांची मागील काही दिवसांपासून गळचेपी सुरू आहे. मनुस्मृती बाबत त्यांनी लगेच भूमीका घेतली होती. छगन भुजबळ कायम माझ्या मदतीला आले आहेत. त्यांना घुसमटल्या सारखं वाटतं आहे हे नक्की आहे, असेही आव्हाड म्हणाले.

अमोल किर्तीकर विजयी आहेत, हे मी पहिल्यापासून बोलत आहे. ज्यावेळी वायकर यांना कमी मते मिळायला लागली त्यावेळी नेमका वायकर यांच्या नातेवाईक यांच्याकडे मोबाईल कुठून आला? ज्या आरो आहेत सूर्यवंशी नावाच्या महिला. त्यांचे कुणा कुणाशी संबंध आहेत हे मला माहिती आहे. कारण त्या ठाण्यात होत्या. त्यांच्यामुळे सगळ्यांना कळलं ईव्हीएममधून मोबाईलवर ओटीपी येतो, असेही आव्हाड म्हणाले.सगळं खापर अजित पवार यांच्यावर फोडून त्यांना बळीचा बकरा बनवू नका, असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला दिला. या देशात अल्पसंख्यांक, दलितांच्या मनातली भीती हे सगळं कोणी मोजतच नाही. भाजपची मतसंख्या कमी झालेली आहे. तानाजी सावंत यांनी 1300 लोकांसाठी केवळ जेवणासाठी 3 कोटी रुपयांचा खर्च सांगितला आहे. जिथे उपचारासाठी खर्च करायला हवा तिथे केवळ 20 लाख खर्च आह. विठ्ठलाच्या नावाने सरकारने टाकलेला हा दरोडा आहे, अशी टीकाही यावेली आव्हाड यांनी केलाय.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!