Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! महायुती सरकारचे पालकमंत्री ठरले?

बीडच्या पालकमंत्री पदावर तोडगा, या सूत्रानूसार वाटप, पहा यादी

मुंबई – राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दोन महिने होऊनही अजून पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आलेले नाही. महायुतीत पालकमंत्री पदावरुन वाद होते. त्यात प्रामुख्याने रायगड, बीड, पुणे यासारखे जिल्हे वादाचे कारण ठरले होते. पण आता पालकमंत्रीपदाची यादी तयार झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आहे. सर्वांची नाराजी मान पान सांभाळून आणि आगामी पालिका निवडणुकांचे गणित लक्षात घेऊन पालकमंत्री निश्चित करण्यात आले आहेत. तसेच आगामी काळात राजकीय समीकरण लक्षात घेऊन बदल केले जाऊ शकतात. यातही बीड वादावर तोडगा काढण्यात आला आहे.

जिल्हा आणि पालकमंत्री

नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
> ठाणे – एकनाथ शिंदे
> पुणे – अजित पवार
> बीड – अजित पवार
> सांगली – शंभूराज देसाई
> सातारा – शिवेंद्रराजे भोसले
> छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
> जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
> यवतमाळ – संजय राठोड / भाजपाचा दावा देखील आहे
> कोल्हापूर – हसन मुश्रीफ
> अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
> अकोला – माणिकराव कोकाटे
> अमरावती – चंद्रकांत पाटील
> भंडारा – राष्ट्रवादी अजित पवार
> बुलढाणा – आकाश फुंडकर
> चंद्रपूर – नरहरी झिरवळ
> धाराशीव – धनंजय मुंडे
धुळे – जयकुमार रावल
> गडचिरोली – एकनाथ शिंदे
> गोंदिया – राष्ट्रवादी अजित पवार
> हिंगोली – आशिष जैस्वाल
> लातूर – गिरीष महाजन
> मुंबई शहर – योगेश कदम
> मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
> नांदेड – भाजपाकडे राहिल
> नंदुरबार – भाजपाचा दावा
> नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
> पालघर – गणेश नाईक
> परभणी – मेघना बोर्डीकर
> रायगड – भरत गोगावले / राष्ट्रवादीचा दावा कायम
> सिंधुदुर्ग- नितेश राणे
> रत्नागिरी – उदय सामंत
> सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
> वाशिम – माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक
> जालना – अतुल सावे
> लातूर – बाळासाहेब पाटील

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!