मोठी बातमी! राज्यातून जमिनीचा एनए टॅक्स पूर्णपणे हटणार
महसूलमंत्री विखे पाटील यांची घोषणा, स्वतः च्या घराचे स्वप्न सत्यात उतरणार
छ. संभाजीनगर दि १७(प्रतिनिधी)- जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कारण राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रेडाई महाराष्ट्र 2023-25 च्या कार्य कारणीच्या पदग्रहण सोहळ्यात बोलताना ‘एनए टॅक्स’ म्हणजे अकृषी करा लवकरच पूर्णपणे हटवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतजमीन नॉंन अॅग्रिकल्चर करण्यासाठी मोठा कर द्यावा लागतो. या पत्रशिवाय जमिनीवर बांधकाम करता येत नाही. दरम्यान, जमिन खरेदीच्या वेळेस देखील हा कर भरावा लागत होता. मात्र सरकार हा एनए कर हटवण्याच्या विचारात सरकार असून खरेदीच्या वेळीच एकदाच हा कर भरावा लागणार आहे. विखे पाटील म्हणाले की, जमिन घेतल्यावर ती दरवर्षी एनए करावी लागते. ही प्रक्रिया गुंतगुंतीची असते. याचा त्रास नागरिकांना होता. त्यामुळे या पुढे जमिन खरेदीच्या वेळेला हा कर एकदाच घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या सोबतच भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीचे जे नकाशे दिले जातात ते देखील १५ दिवसांत घरपोच मिळतील अशी माहिती दिली. याशिवाय मालमत्ताची डिजिटल मॅपिंग केले जाणार आहे. यासाठी महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. मालमत्तांची मॅपिंग ड्रो- नद्वारे सर्वेक्षण करता यावे यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला ड्रोन दिले जात आहेत असे विखे पाटील यांनी सांगितले आहे. सरकारकडून अनेक चांगले आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे स्वतःच घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते, आणि त्या दृष्टीने सरकार पावले उचलत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे.
या अगोदर महसूल विभागाने वाळूच्या संबंधीत मोठाा निर्णय घेतला होता. राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी राज्य सरकारनं नवीन वाळू धोरण तयार केलं आहे. राज्यात १ मे पासून बांधकाम क्षेत्राला लागणारी वाळू सहाशे रुपये ब्रासने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार जास्तीत जास्त ट्रान्स्पोर्टचा खर्च धरून एक हजार रुपयात एक ब्रास वाळू मिळणार आहे.