मोठी बातमी! पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
निवडणुक आयोगाची घोषणा, इंडिया आणि एनडीएत होणार लढत, या दिवशी मतदान तर या दिवशी फैसला
दिल्ली दि ९(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकीची सेमी फायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणाबाजी करण्यात आली आहे. निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूकीची घोषणा केली. आजपासून निवडणूकीची आचारसहिंता लागू करण्यात आली आहे. यात काँग्रेस आणि भाजपात लढत होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मिझोरम, तेलंगाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आता निवडणूकीचा धुरळा उडणार आहे.निवडणुक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी, तर मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, तर राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर सर्व राज्यातील मतमोजनी तीन डिसेंबर रोजी होणार आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा आहेत. राजस्थान मध्ये २०० जागा आहेत तर मणिपूर मध्ये ४०, छत्तीसगड मध्ये ९० आणि तेलंगणा मध्ये ११९ जागांवर विधानसभा निवडणूक होत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, ‘४० दिवसांत सर्व ५ राज्यांना आम्ही भेटी दिल्या आणि तेथील राजकीय पक्ष, केंद्र आणि राज्य अंमलबजावणी संस्थांशी चर्चा केली. मिझोराममध्ये ८.५२ लाख, छत्तीसगडमध्ये २.०३ कोटी, मध्य प्रदेशात ५.६ कोटी, राजस्थानमध्ये ५.२५ कोटी आणि तेलंगणामध्ये ३.१७ कोटी मतदार उमेदवारांचा फैसला करणार आहेत. दरम्यान
मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे, तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभेचा कार्यकाळही जानेवारीतच संपत आहे. निवडणूकीत इंडिया आणि एनडीए आघाडीत सरळ लढत होणार आहे.
केसीआरच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती तेलंगणात सत्तेवर आहे आणि मिझो नॅशनल फ्रंट मिझोराममध्ये सत्तेत आहे. तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आहे.
मिझोराम – ७ नोव्हेंबर मतदान
छत्तीसगड – ७ आणि १७ नोव्हेंबर मतदान
मध्य प्रदेश – १७ नोव्हेंबर मतदान
राजस्थान – २३ नोव्हेंबर मतदान
तेलंगाणा – ३० नोव्हेंबर मतदान
सर्व निकाल – ३ डिसेंबर रोजी