ही भारतीय अभिनेत्री अडकली युद्धभूमी इस्त्रायल मध्ये पण….
या चित्रपटासाठी इस्त्रायलमध्ये पण चित्रपटसारखी झाली अवस्था, चाहते होते चिंतेत, सुखरुप परत
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. या दोन देशात युद्ध सुरु झाले आहे. पण या दरम्यान चित्रपट अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्रायलमध्ये अडकली होती. पण आता ती सुखरुप भारतात परतली आहे.
‘हायफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्यासाठी नुसरत भरुचा इस्रायलमध्ये गेली होती. २८ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा चित्रपट महोत्सव ७ ऑक्टोबरला संपला होता. या चित्रपट महोत्सवात नुसरत भरुचाचा ‘अकेली’ हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यासाठी नुसरत इस्त्रायलला गेली होती. पण आता नुसरत भरुचा मुंबईत सुरक्षित परतली आहे. यावेळी चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी विमानतळावर गर्दी केली होती. सुरुवातीला नुसरतची टीम तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत करत होती. मात्र ते नुसरतबरोबर संपर्क साधू शकले नव्हते. हे समोर आल्यानंतर देशभरात तिच्या चाहत्यांची चिंता वाढली होती. ती सुखरूप परत यावी यासाठी प्रार्थना केली जात होती. मात्र आज तिच्याशी संपर्क झाला आणि ती सुरक्षित असल्याचे कळल्यावर तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. पण ती मुंबईत येईपर्यंत सर्वांनाच तिची काळजी लागली होती पण नुसरत भारुचा आज मुंबईत सुखरुप परतली आहे. तिचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती प्रचंड घाबरल्याचे दिसत होती. भारतीय दुतवासाच्या मदतीने नुसरत दुबईमार्गे इस्रायलमधून भारतात आली आहे. विशेष म्हणजे इस्त्रायलमध्ये दाखवण्यात आलेला अकेली चित्रपट हा युद्धाच्या वातावरणात अडकलेल्या मुलीच्या घरी येण्याच्या संघर्षावर आधारित आहे. नेमकी तशीच घटना नुसरतबरोबर घडली आहे. दरम्यान नुसरतने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. प्यार का पंचनामा, ड्रीम गर्ल, जनहित में यारी, राम सेतू सारख्या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
इस्त्रायल आणि पेलेस्टाईनमध्य़े युद्ध सुरु झाले आहे. आतापर्यंत इस्त्रायलमध्ये शेकडो नागरीकांचा मृत्यू झाला आहे. कारण हमासने २० मिनिटांत इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागले, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू आहे.