मोठी बातमी! भाजपा – राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र येणार?
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, भाजपासोबत जाण्यावरून पक्षात मतभेद
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा फेरबदल होण्याची शक्यता आहे. कारण भाजपाला पुन्हा एकदा राष्ट्रवादीने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे जशी अनपेक्षितपणे महाविकास आघाडी सत्तेत आली होती. त्याप्रमाणे भाजप राष्ट्रवादी युतीमुळे राजकीय धुळवड रंगण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या नागालँडमधील निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. याठिकाणी भाजपा-राष्ट्रवादी युती सत्तेसाठी एकत्र येण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. नागालँडमधील स्थानिक पदाधिकारी सरकारमध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहेत. तर पक्षाचे हायकमांडने अद्याप त्या प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तर राज्यात सर्वपक्षीय सरकार अस्तित्वात येणार आहे. एकीकडे राष्ट्रवादीने सरकारच्या समर्थनार्थ पत्र दिल्याची बातमी आहे तर राष्ट्रवादीचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी याबाबत खंडन करत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही असं सांगितले आहे. विरोधी पक्षात बसण्याऐवजी जर राष्ट्रवादीने भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणावरही होतील. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील वातावरण बदलत आहे असे विधान काही दिवसापूर्वी केले होते. त्याचेही अनेक कांगोरे पुढे येऊ शकतात. शिवाय आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत याचाही फटका बसू शकतो त्यामुळे सत्तेत जाण्याचा निर्णय घेताना राष्ट्रवादीला या बाबींचा विचार करावा लागणार आहे. जर राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला तर तिथे विरोधी पक्ष अस्तित्वात नसेल. त्याचबरोबर राज्यात सर्वपक्षीय सरकार अस्तित्वात येणार आहे.
नागालँडमध्ये NDPP आणि भाजपा यांना ६० पैकी ३७ जागा मिळाल्या आहेत. नागालँडच्या नवनियुक्त मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथही घेतली आहे. राष्ट्रवादीने ७ जागा, आठवले गटाने २ जागा, जेडीयू १, रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्तीने १ जागा जिंकली आहे.