Latest Marathi News
Ganesh J GIF

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या होळीच्या हटके अंदाजात शुभेच्छा

शुभेच्छा देताना सोबत दिसली खास गोष्ट, नेहमी चर्चेत राहणाऱ्या या पोस्टमुळेही चर्चेत

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- आज राज्यात आणि देशभरात होळी आणि धूलिवंदन सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वजण मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत आहेत. या होळीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस यांनी होळीच्या एकदम हटके शुभेच्छा दिल्या आहेत.


अमृता फडणवीस यांनी होळीच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडीओ शेअर केल्या आहेत. पोस्ट केलेल्या व्हिडीओत त्यांची मुलगी दिवीजा फडणवीस आणि त्यांचा पाळीव पोपट दिसत आहे. “धरती के सभी प्रणियो को होली की शुभकामनाएँ!” असं कॅप्शन या पोस्टला त्यांनी दिले आहे. अमृता सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. विविध सणांनिमित्त त्या सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देताना दिसतात.गेल्यावर्षी अमृता फडणवीस यांनी होळीच्या काव्यमय शुभेच्छा दिल्या होत्या. “दिया मुझे जो तूने है , वो कम लगे जरा जरा ! बेरंग-सी इस राह में , कुछ रंग भरे जरा जरा अतरंगी नहीं तो ना सही , सतरंगी बने जरा जरा !” अशी कविता करत त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. अमृता फडणवीस या आपल्या गाण्यासाठी व राजकीय वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात.दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज मुंबईत होळी साजरी केली. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी होळी आणि धूलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा केला.


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. अनेकवेळा त्यांच्या वक्तव्यामुळे तर काही वेळा त्याच्या गाण्यामुळे त्याचं कौतुकही होत. तर कधी त्यांना ट्रोलही केलं जाते. पण त्या चर्चेत मात्र असतात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!