Latest Marathi News
Ganesh J GIF

पोरांना तयारीला लागा! पुणे महापालिकेत मोठी भरती

आरोग्य, अग्निशमन दल विभागात बंपर भरती,अशी असणार प्रक्रिया

पुणे दि ८(प्रतिनिधी)- पुणे महापालिकेत नव्या २०० पदांची भरती केली जाणार आहे. आरोग्य, अग्निशमन दल आणि अन्य विभागातील वरिष्ठ पदभरती केली जाणार असून ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. सध्या महापालिकेकडून ४४८ पदांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ती पूर्ण झाल्यानंतर नवीन भरती होणार आहे.

पुणे महापालिकेकडून कनिष्ठ अभियंता, लिपिक, अतिक्रमण सहायक निरीक्षक, सहायक विधी सल्लागार या पदांवरील ४४८ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. ऑनलाइन परीक्षेनंतर गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. तर कनिष्ठ अभियंता पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. डिसेंबर महिन्यात २०० जागांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. यामध्ये काही जागा या वरिष्ठ पदाच्या असणार आहेत. महापालिकेत ३४ गावांचा समावेश झाला आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक असल्याने २००७ च्या आकृतिबंधातील जागांमध्ये वाढ केली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला जाईल, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे अनेक तरूणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आकृतिबंधानुसार कनिष्ठ अभियंत्यांची संख्या ८०० आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत महापालिकेत ३४ गावांचा समावेश झाला आहे, तसेच अनेक मोठे प्रकल्प पालिकेने हाती घेतले आहेत.त्यासाठी आकृतिबंधातील मंजूर अभियत्यांची संख्या २५ ते ३० टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!