Just another WordPress site

‘दादा रेडा घेऊन ऑफिसमध्ये आलोय तुम्ही या….’

हवेलीतील ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हवेली दि ८(प्रतिनिधी)- दाेन वर्ष ग्रामपंचयात घरा जवळील गटाराचा प्रश्न साेडवित नसल्याने एका ग्रामस्थाने थेट रेड्यासह ग्रामपंचायत कार्यालय गाठत अनोखे आंदोलन केले आहे. आणि जाेपर्यंत प्रश्न सुटणार नाही ताेपर्यंत कार्यालयातच ठिय्या मांडणार असल्याची भुमिका ग्रामस्थाने भूमिका घेतली होती. हा प्रकार कराड तालुक्यातील वडगाव हवेली तालुक्यात घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कराड तालुक्यात वडगांव हवेली गाव आहे. या गावातील एक ग्रामस्थ गेल्या दाेन वर्षापासून घराजवळ असलेल्या गटाराच्या पाण्याचा त्यांच्या कुटुंबाला माेठा त्रास हाेत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत दरबारी अनेकदा तक्रारी केल्या आहेत.पण ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थानी ग्रामपंचायत कार्यालयात चक्क रेडा घेऊन जात अनोखे आंदोलन केले. तिस-या मजल्यावरील ग्रामसेवकाच्या कार्यालयात रेड्यासह त्यांनी ठिय्या मांडत प्रश्न सुटेपर्यंत उठणार नसल्याची भुमिका घेतली. त्यामुळे एका कर्मचा-यांनी दादा नामक व्यक्तीला फाेन लावून त्याची माहिती दिली. पण ग्रामस्थानी तुम्ही आल्याशिवाय येथून हलणार नाही अशी भुमिका घेतली. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली.

GIF Advt

सध्या या आंदोलनाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे, व्हायरल झालेला व्हिडिओची चर्चा होत आहे. पण साधारण गोष्टीसाठीही आंदोलन करावे लागत असल्याने ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. पण प्रशासन ढिम्म असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!