Latest Marathi News
Ganesh J GIF

नेपाळ विमान अपघाताबाबत मोठा खुलासा.. ! जाणून घ्या, ताजे अपडेट.

नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून भीषण अपघात झाला. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात विमान कोसळले. ज्यात भीषण आग लागली. या अपघातात एका लहान मुलासह 18 जणांचा मृत्यू झाला.पायलट गंभीर जखमी झाला होता, परंतु या अपघाताबाबत नवीन अपडेट्स समोर आले आहेत.सौरी एअरलाइन्सच्या बॉम्बार्डियर सीआरजे-200 विमानात 19 जण होते. नियमित देखभालीसाठी हे विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेले जात होते.नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जखमी कॅप्टन मनीष रत्न शाक्य यांना वाचवण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. या अपघातात 18 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांची ओळख सह पायलट एस कटुवाल, एअरलाइनची कर्मचारी आणि यमनचा नागरिक आरेफ रेडा अशी समोर आली आहे.

या अपघातात सौरी एअरलाइन्सचे तंत्रज्ञ मनु राज शर्मा आणि त्यांची पत्नी प्रजा खतिवडा यांच्यासह त्यांचा ४ वर्षांचा मुलगा आदिराज शर्मा यांनाही जीव गमवावा लागला. मृत तंत्रज्ञाची पत्नी प्रिजा शर्मा या ऊर्जा, जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्रालयात संगणक परिचालक म्हणून कार्यरत होत्या. या अपघातानंतर प्रजा शर्मा आणि त्यांचा मुलगा सुरुवातीला कंपनीचे कर्मचारी असल्याचेही समोर आले होते, मात्र नंतर ते प्रवासी म्हणून प्रवास करत असल्याचे उघड झाले.मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघातात बळी पडलेल्या 18 लोकांपैकी 15 जणांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. या सगळ्यात फक्त कॅप्टन शाक्यच जिवंत राहू शकला, त्याच्यावरही काठमांडूच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.या संपूर्ण अपघाताची चौकशी केली असता, काठमांडूहून पोखराला जाणारे विमान चुकीच्या दिशेने वळल्याचे समोर आले. त्याला डावीकडे वळायचे होते, पण त्याऐवजी ते उजवीकडे वळाले. या अपघातामागील कारण अद्याप समजू शकले नसले तरी यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून अहवाल सादर करण्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!