…तर २०२४ साली भाजपाची सत्ता आल्यास अमित शहा पंतप्रधान होणार
योगी अदित्यनाथ गृहमंत्री होणार, तर नरेंद्र मोदींकडे या पदाचा कार्यभार येणार?, बघा कसा असणार भाजपाचा इलेक्शन प्लॅन?
दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- भारताचे पंतप्रधान नुकतेच जगातील लोकप्रिय नेते ठरले आहेत. तसेच पाच राज्यातील निवडणुकीत भाजपा नरेंद्र मोदींचा चेहरा घेऊनच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयी झाल्यास मोदीच पंतप्रधान होतील असा दावा केला जात आहे. पण आता एक वेगळाच दावा करण्यात येत आहे. त्यामुळे देशाच्या राजकारण वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. देशातील एका शेतकरी नेत्याने मोठी राजकीय भविष्यवाणी केली आहे.
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी मेरठमध्ये मोठा दावा केला आहे. टीकैत म्हणाले की, २०२४ ला भाजपचं सत्तेत येईल. यावेळी प्रथम नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील पण मध्येच ते पद सोडलातील. त्यानंतर ते राष्ट्रपती होतील. नरेंद्र मोदी यांच्या जागी अमित शाह पंतप्रधानपदावर विराजमान होतील तर गृहमंत्रीपदाची सूत्रे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वीकारतील. असा दावा केला आहे. त्याचबरोबर २०२४ साली भाजपाच सत्तेत येणार असा दावा करण्यात आल्याने इंडिया आघाडीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. टिकैत यांचा दावा गृहीत धरल्यास २०२७ साली देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होणार आहेत. तर त्याचवर्षी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे २०२४ बरोबरच २०२७ हे वर्ष देखील मोठ्या राजकीय घडामोडींचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान सपा आमदार अतुल प्रधान यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राकेश टिकैत मेरठमध्ये आले होते. पण त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा होत आहे.
नुकत्याच पाच राज्याच्या निवडणुका झाल्या. त्यातील तीन राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा विश्वास कमालीचा वाढला आहे. तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपाने आत्तापासूनच तयारी सुरु केलेली आहे.