Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपाचा आमदार चक्क विधानसभेत पाहत आहे पाॅर्न व्हिडिओ

पाॅर्न पाहतानाचा व्हिडिओ व्हायरल, आमदारासह भाजप अडचणीत

त्रिपुरा दि ३०(प्रतिनिधी)- भाजपचा एक आमदार विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहत असल्याची क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाला असून, भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. पण तोच भाजप अडचणीत आला आहे.

कम्युनिस्ट पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यात सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणाऱ्या भाजप आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना सभागृहात खुर्चीवर बसून आमदार मोबाईलवर पॉर्न पाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ त्रिपुरा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यानचा आहे. त्रिपुराच्या बागबासा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार जादब लाल नाथ हे पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याचे दिसत आहे. जादब लाल नाथ आपल्या सीटवर बसून मोबाईलवर व्हिडिओ पाहत असल्याचे दिसत आहे. फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैर यांनी देखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.जादब लाल नाथ यांनी कम्युनीस्ट पक्ष सीपीएमचा सर्वात मजबूत किल्ला मानल्या जाणाऱ्या बागबासा विधानसभा मतदारसंघात भाजपला विजय मिळवून दिला होता.

बागबासा येथे भाजपचे जाधव लाल नाथ यांनी सीपीएमच्या बिजीता नाथ यांचा विजयी रथ रोखला. जादब लाल नाथ यांनी सीपीएमच्या विद्यमान आमदार बिजीता नाथ यांचा चाैदाशे पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. तृणमूल काँग्रेसचे बिमलनाथ तिसरे तर टिपरा मोथाच्या कल्पना सिन्हा चौथ्या स्थानावर आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!