रामनवनीनिमित्त या महिला खासदाराच्या लुकने वेधले लक्ष
व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल, 'हिंदू शेरनी' बॅनरची जोरदार चर्चा
अमरावती दि ३०(प्रतिनिधी)- रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. नवनीत राणा यांचा हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. याशिवाय त्यांचा नावाचे बॅनरदेखील शहरात झळकले आहेत.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. नवनीत राणांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी डोक्याला भगवं उपरणं बांधलंय. काळा पंजाबी ड्रेस परिधान करून त्यांनी बुलेट स्वारी केलीय. ‘ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर करते है.. जय श्रीराम’, असे म्हणत नवनीत राणा यांनी बुलेटस्वारीला केली आहे.खास स्टाइलमध्ये त्यांनी बुलेटस्वारी केली. डोक्याला भगवं उपकरण आणि काळा ड्रेस परिधान केल्याने नवनीत राणा यांचा हा लूक एकदम खास आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसा पठनासाठी केलेलं आंदोलन, याविरोधात त्यांच्याविरोधात दाखल झालेला देशद्रोहाचा गुन्हा आणि तुरुंगवास यामुळे नवनीत राणा चांगल्याच प्रकाशझोतात आल्या होत्या. सध्या त्यांचा हटके व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
राम नाम का नारा है, हर घर भगवा छाया है, श्री राम नवमी के शुभ अवसर पर बुलेट राइडिंग करते हुए।
जय श्री राम।। जय हनुमान।।#RamNavmi #रामनवमी #ramnavami2023 pic.twitter.com/rRH2wPQ2Lz— Navnit Ravi Rana (@navneetravirana) March 30, 2023

येत्या ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती आणि नवनीत राणा यांचा वाढदिवस यानिमित्त अमरावतीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.अमरावती हनुमानाची १११ फुटांची मूर्ती उभी केली जाणार आहे. त्याचे भुमिपुजन ६ तारखेला होणार आहेत. त्या कार्यक्रमाच्या पोस्टरमध्ये नवनीत राणा यांचा उल्लेख ‘हिंदू शेरनी’ असा करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यासाठी हे पोस्टर्स झळकवण्यात आले आहेत.