Latest Marathi News
Ganesh J GIF

लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजपाचा दणदणीत विजय

राजस्थान, मध्यप्रदेशसह छत्तीसगडमध्येही 'कमळ' फुलले, तेलंगाणाचा काँग्रेसला 'हात', पहा कोणाला किती जागा?

दिल्ली दि ३(प्रतिनिधी)- संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि लोकसभेची सेमीफायनल म्हणून चर्चिल्या गेलेल्या चार राज्यातील निकाल आज अखेर जाहीर झाला. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर तेलंगाणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निकालात भाजपाची कामगिरी दमदार ठरली आहे. मिझोरमचा निकाल उद्या जाहिर होणार आहे.

राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात भाजपाने सत्तेत असलेल्या काँग्रेसला खाली खेचत बहुमत मिळवले आहे. यातील छत्तीसगडमधील विजय भाजपाला बोनस ठरला आहे. राजस्थानमध्ये भाजपाने बहुमत मिळवले आहे. भाजपाने या निवडणुकीत २०० पैकी ११५ जागा जिंकत बहुमताने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला ६९ जागांवर विजय मिळवता आला आहे. २०१८ च्या निवडणुकीचा विचार करता भाजपाला ४१ जागांचा फायदा झाला आहे. तर काँग्रेसला ३० जागांचे नुकसान झाले आहे. भाजपाकडून आता मुख्यमंत्री म्हणून वसुंधरा राजे आणि मेघवाल यांच्यात चुरस पहायला मिळणार आहे. दरम्यान या निवडणुकीत बसपाने २ तर अपक्ष १३ जागांवर विजयी झाले आहेत. मध्यप्रदेशमध्ये भाजपाने आपली सत्ता कायम राखली आहे. या निवडणुकीत २३० पैकी १६४ जागा जिंकत भाजपाने जोरदार बहुमत मिळवले आहे. तर काँग्रेसला अवघ्या ६५ जागा जिंकता आल्या आहेत. तर फक्त एका ठिकाणी अपक्षाने विजय मिळवला आहे. भाजपाने फक्त सत्ताच कायम राखली नाही तर २०१८ ला जिंकलेल्या भागांपेक्षा ५१ जागा जास्त जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने ४८ जागा गमावल्या आहेत. शिवराज चाैहान पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार की भाजपा दुसरा चेहरा देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता कायम राखील असा अंदाज होता. पण भाजपाने अनपेक्षितपणे छत्तीसगडमध्ये विजय मिळवला आहे. ९० पैकी ५४ जागा जिंकत भाजपाने छत्तीसगड काबीज केला आहे. तर काँग्रेसला ३५ जागांवर विजय मिळवता आला आहे. चुरशीच्या ठरलेल्या लढतीत भाजपाने काँग्रेसला पराभवाची धुळ चारली आहे. मागील निवडणुकीचा विचार करता भाजपाला २८ जागांचा फायदा झाला असून काँग्रेसला २४ जागांचे नुकसान झाले आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री कोण हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तेलंगाणात मात्र काँग्रेसने बीआरएसचा पराभव करत बहुमत मिळवले आहे. तर दक्षिणेतील राज्य जिंकण्यात भाजपाला पुन्हा एकदा अपयश आले आहे. तेलंगाणात काँग्रेसने ११९ पैकी ६४ जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. तर बीआरएसला अवघ्या ३९ जागा जिंकता आल्या आहेत. तर भाजपाला ८ जागांवर विजय मिळवता आला आहे. तर एमआयएमने ७ जागा जिंकल्या आहेत. अगोदरच्या निवडणूकीचा विचार करता काँग्रेसला ४४ तर भाजपाला ७ जागांचा फायदा झाला आहे. तर दुसरीकडे बीआरएसला ४८ जागांचे नुकसान झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!