Latest Marathi News
Ganesh J GIF

बॉलीवूडची सौंदर्यवती अभिनेत्री लवकरच देणार गुड न्यूज

घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे होणार आगमन, इन्स्टापोस्ट जोरदार व्हायरल, त्या चर्चेला पूर्णविराम

मुंबई – बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे कतरिनाच्या गरोदरपणाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

बेबी बंपसोबत ब्लॅक अँड व्हाईट फोट टाकत कतरिनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही बातमी शेअर केली आहे. त्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून कतरिनाच्या प्रेग्नन्सीबद्दल विविध चर्चा सुरु होत्या. मात्र त्यावर कतरिना किंवा विकी दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. काही महिन्यांपूर्वी त्या दोघांचा एअरपोर्टवरील फोटो प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्ये व्हाईट लूज ड्रेसमध्ये कतरिना दिसल्यावर प्रेग्नन्सीच्या चर्चांनी जोर धरला होता. आता खुद्द कतरिनाने पती विक्की कौशलसोबत एक सुंदर फोटो शेअर करत गोड बातमी दिली आहे. सध्या ही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण दोघांनाही शुभेच्छा देत आहेत. कतरिना आणि विक्कीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कतरिना पांढऱ्या रंगाच्या स्लीव्हलेस ड्रेसमध्ये दिसते आहे आणि ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना पाहायला मिळते. विक्की कौशल तिच्या बेबी बंपवर प्रेमाने हात ठेवलेला दिसतो. फोटोमध्ये दोघंही एकमेकांचा हात पकडलेले आहेत आणि खूप आनंदी व उत्साही दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे -“आमच्या आयुष्याच्या सर्वात सुंदर पर्वाची सुरुवात होत आहे. आमचं हृदय आनंदाने आणि कृतज्ञतेने भरलेलं आहे.”कतरिना आणि विक्कीला अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जिने आपल्या सौंदर्य, अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे चित्रपटप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता ती लवकरच आई ही वास्तव जीवनातील व्यक्तिरेखा साकारणार आहे.

कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केलं होतं. त्यांचा विवाहसोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती . विक्की संजय लीला भन्साळी यांच्या “लव्ह अँड वॉर” या चित्रपटात दिसणार आहे. तर कतरिना कैफ शेवटचं 2024 मध्ये “मेरी क्रिसमस” या चित्रपटात झळकली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!