Latest Marathi News

BREAKING NEWS – हडपसर जवळील मांजरी येथील शाळेच्या पाठीमागे आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू, परिसरात खळबळ

पुण्यातील हडपसर भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील हवेली तालुक्यामध्ये एका स्मशानभूमीजवळ एक ग्रेनेड आढळून आली आहे. पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने धाव घेऊन ग्रेनेड निकामी केला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील एका स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला आहे. या परिसरात असलेल्या आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजुला बॉम्ब सदृश वस्तु आढळून आली आहे.
या परिसरात राहणाऱ्या अभिमान रोहीदास गायकवाड यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तातडीने पोलीस पाटील अंकुश उंद्रे आणि अशोक आव्हाळे यांना सांगितले. त्यानंतर पोलीस पाटील यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मांजरी खुर्द येथे पोलीस पथक आणि बॉम्ब शोधक पथक दाखल झाले. पथकाने पाहणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खूप वर्षांपूर्वीचा जुना ग्रेनेड तिथे आढळून आलेला आहे. ७ ते ८ वर्षापूर्वी त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता. पावसामुळे तो आतावर आलेले दिसत आहे. बॉम्बशोधक पथकाने हा ग्रेनेड निकामी केला आहे. हा ग्रेनेड या भरावामध्ये कुठून आणि कसा आला याचा तपास पोलीस करत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!