Just another WordPress site

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण करावे – मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव 

मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी – वार्ताहर पत्रकार त्याचबरोबर वृत्तसंस्था तसेच वेब पोर्टल यामध्ये काम करणारे पत्रकार कर्मचारी हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहेत त्यांचे अनेक विषय आहेत त्यांच्या अनेक अडचणी आहेत त्याबाबतीत नवनिर्वाचित मुख्यमंत्री व नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे सविस्तर चर्चा करत वार्ताहर कल्याणकारी महामंडल निर्माण होणे आवश्यक असल्याचे अभ्यासपूर्णरित्या सांगितले . तसेच पत्रकार वार्ताहार हा सुद्धा राजकीय प्रवाहात समाविष्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना राज्यपाल नाम निर्देशित विधान परिषदेवर संधी मिळणे गरजेचे असल्याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले.

कलाकार. समाजसेवक. शास्त्रज्ञ सहकार क्षेत्रातील तज्ञ. साहित्यिक यांना नेहमीच राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेवर संधी मिळते मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार. वार्ताहर हा नेहमीच वंचित राहतो दुर्लक्षित राहतो त्यालाही राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात आणून संधी देण्याबाबत सविस्तर मुद्दा मांडला. तेव्हा उपमुख्यमंत्री महोदय यांनी आपण सदरच्या विषयी सकारात्मक असल्याचे नितीन जाधव यांच्याशी बोलताना सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदरच्या विषयात सकारात्मकता दाखवलेली आहे .

GIF Advt

आपल्या संघटनेचे मार्गदर्शक संघटक संजयजी भोकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच दूरदृष्टी लाभलेले नाविन्यपूर्ण योजना उपक्रम राबवत असलेले प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे. उत्कृष्ट अभ्यासू संघटक सरचिटणीस विश्वासरावजी आरोटे.माझे मित्र बंधू नवनाथ जाधव तसेच सर्व विभागीय अध्यक्ष.जिल्हाध्यक्ष.तालुकाध्यक्ष यांचचे सर्वांचे सहकार्य मिळत असल्यामुळेच आपण या सर्व बाबींची मागणी सर्वोच्च कार्यालयात करू शकत आहोत त्याचा मला आनंद होत आहे. सदरच्या भेटी विषयाच्या बातम्या वृत्तपत्र व पोर्टल youtube वरती प्रसिद्ध झाल्यामुळे संघटनेचे नाव चर्चेत आलेले आहे तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडे सदरच्या बातम्या ही वाचण्यासाठी पाठवलेले आहेत. पुढील येणाऱ्या काळात आपल्या सर्व मागण्या त्याचबरोबर आपले सर्वांचे अभ्यासू विचार शासकीय योजना मिळवण्यासाठी पत्रकार संघाची कार्यशैली उपयोगी पडेल तसेच सर्व पत्रकारांचे सहकार्य लाभले त्याबद्दल आभार – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव 

 

बघा काय म्हणाले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव 

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!