Just another WordPress site

परीक्षा हॉलमध्ये ५०० मुलींना पाहून मुलगा झाला बेशुद्ध

सोशल मीडियावर चर्चेचा पाऊस, बघा कुठे आणि का आली चक्कर

नालंदा दि २(प्रतिनिधी)- बिहारमधील नालंदातील एका परिक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याला चक्कर आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावं लागले. पण त्याला चक्कर का आली यामागील कारण एैकल्यानंतर चकित करणारे उत्तर समोर आले आहे. या उत्तराची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे. कारण चक्कर येण्याचं कारणही अजब आहे.

GIF Advt

नालंदामध्ये परीक्षेदरम्यान ब्रिलियंट कॉन्व्हेंट प्रायव्हेट स्कूलमध्ये ही घटना घडली. बिहार बोर्डाच्या १२वीच्या परीक्षेदरम्यान मनीष शंकर या विद्यार्थ्याला चक्कर आली. कारण तो जेंव्हा परिक्षा देण्यासाठी केंद्रावर पोहोचला त्यावेळेस मनीषला ५०० विद्यार्थिनींमध्ये एकटेच परीक्षा केंद्रात बसवण्यात आले होते. आपल्या आजबाजूला एवढ्या मुलीपाहुन मनीष घाबरून गेला.जास्त मुलींमध्ये बसल्यामुळे तो इतका घाबरला की परीक्षा देण्याऐवजी तो चक्क बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडल्यानंतर त्याला तातडीने बिहार शरीफ सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर अनेक नेटक-यांनी आश्चर्य व्यक्त करत अफलातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी मनीषबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.


मुलाची मावशी पुष्पा लता सिन्हा यांनी सांगितले की, तो परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताच तिथे फक्त मुली होत्या. परीक्षा केंद्रावर ५०० विद्यार्थिनींमध्ये एकच विद्यार्थी होता. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. दरम्यान बिहार बोर्डची माध्यमिक परीक्षा कालपासून सुरू झाली आहे. १ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!