ब्राम्हण समाजाचं ठरलयं कसब्यात धडा कसा शिकवायचा
पुण्यात पुन्हा भाजपाविरोधात बॅनरबाजी,ब्राम्हणांची नाराजी भाजपाच्या अडचणीची
पुणे दि १२ (प्रतिनिधी)- आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक होत आहे. पण ही निवडणूक भाजपासाठी जड जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ब्राम्हण उमेदवार न दिल्याने कसब्यातील ब्राम्हण समाज कमालीचा नाराज झाला आहे. आता पुन्हा एकदा कसब्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
कसब्यात टिळकांनीएैवजी हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे याआधीही पुण्यात ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले होते. आता पुन्हा एकदा पुण्यात आमचेही ठरले आहे, धडा कसा शिकवायचा… कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा…, कसबा हा टिळकांचा का काढला आमच्याकडून कसबा आम्ही दाबणार नोटा अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. चिंचवड मतदारसंघात जगताप यांच्या घरात उमेदवारी दिली आहे. पण टिळकांवर अन्याय केल्याची भावना आहे. पुणे जिल्ह्यात २१ आमदार असताना प्रत्येक समाजाचं चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व असताना ब्राह्मण समाजाला का डावलण्यात आले? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे भाजपाची अडचण झाली आहे. तर धंगेकर यांनी टिळकांची भेट घेत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
भाजपाने २०१९ च्या निवडणूकीत कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णीच्या जागी यांचे तिकीट कापत त्यावेळी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आले होते. तर आता टिळकांच्या जागी रासनेंना उमेदवारी देण्यात आली आहे. आता बापट यांच्याएैवजी दुसरा उमेदवार दिला जाईल अशी भिती ब्राम्हण समाजात आहे.