अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी घड्याळ सोडत हाती घेतले कमळ
राष्ट्रवादीला रामराम करत नाशकात भाजपात प्रवेश, पक्षप्रवेश करताना म्हणाल्या
नाशिक दि ११(प्रतिनिधी) – मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यतक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या अचानक भाजप प्रवेशाचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रिया बेर्डे यांनी ७ जुलै २०२० ला खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी कोरोनामुळे लाॅकडाऊनच्या काळात सिनेसृष्टीतील कलाकारांकडे काम नाही त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजकारणात जाऊन सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचे बर्डे यांनी स्पष्ट केले होते. पण आता भाजपात प्रवेश करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही.
स्व.लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी असलेल्या प्रिया बेर्डे या बेर्डे यांनी राजकारणात प्रवेश केला असला तरी अभिनय क्षेत्रातही त्या सक्रिय आहेत अनेक हिंदी तसेच मराठी मालिका आणि सिनेमा त्या काम करत आहेत धनंजय माने इथेच राहतात का या धम्माल विनोदी नाटकात सध्या त्या काम करत आहेत तसंच सोशल मीडियावरही सक्रिय असून मुलांबरोबर चे फोटो शेअर करत असतात.