Latest Marathi News
Ganesh J GIF

‘ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी ईडीची छापेमारी’

जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव, मैदानाचे नाम बदलले, नेमके काय घडले?

दिल्ली दि २०(प्रतिनिधी)- एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं आणि विश्वषचकावर नाव कोरले. भारताने केलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा केल्या आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पण यावरून आता राजकारण खेळले जात आहे. यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी एक ट्विट (एक्स) करत भाजपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. महुआ मोईत्रा यांनी लिहिलं, ‘अहमदाबादमधील स्टेडियमचं नाव बदललं. जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव झाला.’ तर दुसऱ्या पोस्टमध्ये महुआ मोईत्रा म्हणाल्या, ‘ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) छापेमारी केली.’ असे ट्विट करत भाजपाला सुनावले आहे. दरम्यान आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. दरम्यान अंतिम सामना नरेंद्र मोदी मैदानात खेळवण्यात आल्यामुळे भारताचा पराभव स्वीकारावा लागला असा आरोप सोशल मिडीयावर केला जात आहे. पण मोईत्रा यांनी मात्र अनोखे ट्विट करत भाजपाला डिवचले आहे. ईडी, सीबीआय, आयटी या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात केला जातो, असा आरोप अनेकदा विरोधी पक्षांनी केला आहे. एवढेच नाही तर गेल्या काही वर्षात अनेक नेत्यांच्या घरी ईडी, सीबीआय, आयटीचे छापेही पडले आहेत. यावरूनच महुआ मोइत्रा यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर, कलाकार, बॉलिवूड सेलिब्रिटी यांनी हजेरी लावली होती. यावरून राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

ट्रेव्हिस हेडने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले आणि विश्वषचक जिंकला. अंतिम सामन्यात भारतीय संघ २४० धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा केल्या आणि विश्वचषक जिंकला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!