Latest Marathi News
Ganesh J GIF

श्री संत गोराबा काका पालखीतील वारकऱ्यांसाठी दहिटणे नगरीत आरोग्यसेवा

श्री रेवणसिध्द हॉस्पिटल व हेल्प फाऊंडेशन व घडमोडे परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य सेवा, दहिटण्यातील नागरिकांचाही हातभार

बार्शी दि २०(प्रतिनिधी)- श्री संत गोरोबा काका यांचा कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेला पालखी सोहळा चांगदेव पाटलांची कर्मभूमी असलेल्या दहिटणे नगरीत मुक्कामी असताना सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा शेकडो वारकऱ्यांनी लाभ घेतला.

श्री क्षेत्र वाणेवाडी ते पंढरपूर पालखी सोहळ्याची शतकापेक्षा जास्त वर्षाची परंपरा आहे.कार्तिकी एकादशी निमित्त याहीवर्षी पालखी सोहळा दहिटणेत मुक्कामाला होता. पालखीच्या आगमनासाठी रांगोळी काढून उत्साही वातावरण निर्मिती करण्यात आली होती. यावेळी श्री रेवनसिद्ध हाॅस्पीटल, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दहिटणे, आणि घडमोडे परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तर कामगार कल्याण विभागाचे बाळासाहेब आंधळकर यांच्या हेल्प फाउंडेशन तर्फे या आरोग्य शिबीरात मोफत औषधोपचाराची मदत करण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी देखील सढळ हाताने मदत केली. या आरोग्य वारकऱ्यांची सुश्रुषा करण्याबरोबरच मोफत ओैषधे देखील देण्यात आली. या आरोग्य शिबीराबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. विठ्ठलभक्तीने पंढरीकडे निघालेल्या या वारकऱ्यांची आता प्रत्येक वर्षी हे शिबिर राबवले जाईल असे रेवनसिद्ध हाॅस्पीटलचे डाॅ आदेश साखरे यांनी सांगितले. तर या सेवेबद्दल पालखीचे प्रमुख ह.भ.प पांडुरंग महाराज उंबरे यांनी सर्व डॉक्टर, मेडिकल स्टाफ व सर्व गावकऱ्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान पालखीतील भाविकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. विकास घडमोडे, लिंबाजी घडमोडे,बसवेश्वर घडमोडे,विठ्ठल काशीद यांच्यातर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तर गावातील अनेक ग्रामस्थांकडून चहाची देखील सोय करण्यात आली होती. पालखीमुळे गावात भक्तीमय वातावरण तयार झाले होते.

संत गोराबा काका कुंभार हे मराठवाड्यातील फार मोठे विठ्ठल भक्त होते. तसेच त्यांनी आपल्या अभंगातून विठ्ठल भक्तीबरोबर समाजप्रबोधन देखील केले. त्यांनी सुरु केलेला पालखी सोहळा पांडूरंग महाराज उंबरे आणि सहका-यांनी अखंडपणे सुरु ठेवली आहे. तसेच वाणेवाडी गावातही नेहमीच भागवत धर्माची पताका कायम उंचावत ठेवली आहे. यावेळी हेल्प फाउंडेशनचे बाळासाहेब आंधळकर, डॉ. रणजित मोहिते ,डॉ.संकेत साखरे , डॉ. शिवानी साखरे, आदेश साखरे , अमृता गाटे, रोहिणी घडमोडे, सिद्धी आंधळकर, शाहू काशीद, प्रांजली चेट्टी , विश्वनाथ शिराळ, बाबासाहेब काशीद , सागर काशीद यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!