Just another WordPress site

BREAKING NEWS – मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनोळखी कार घुसली, मोठा अपघात टळला

नेमकं काय घडलं? नक्की बघा

मुंबई – काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्याच्या अपघाताची बातमी समोर आली होती. राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना ते पुण्याहून औरंगाबादच्या दिशेला निघाले होते. त्यावेळी गाड्यांचा वेग जास्त होता. आणि अचानक पुढच्या गाड्यांनी ब्रेक घेतल्याने मोठा अपघात झाला होता. या अपघातात अनेक गाड्यांचं नुकसान झालं होतं. पण सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. मोठमोठे नेते आणि मंत्र्यांचा ताफ्याचा वेग हा जास्त असतो. त्यामुळे असा ताफा ज्या परिसरातून जातो त्या परिसरात पोलिसांकडून सर्व खबरदारी घेतली जाते. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याच सुरक्षेत पोलिसांकडून मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर  गेले होते. तिथून परतत असताना धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. पण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामधील गाड्यांचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!